सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेते किसन जाधव यांची सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती झालीय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शिक्षण मंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेच्याप्रसंगी किसन जाधव यांना जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्तीचे पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांची उपस्थिती होती. राज्याचे उपसचिव नि.भा. खेडकर यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी व माणिक कांबळे उपस्थित होते.
किसन जाधव यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नियुक्तीचे पत्र प्रदान केल्यानंतर सोलापूर शहराच्या विविध विकास कामांकरिता सकारात्मक कामे करण्यासाठी संधी आणि जो विश्वास आपण दाखविला यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष बळकट करण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
येत्या ०३ फेब्रुवारी रोजी सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाच्या उद्घाटन आणि मेळाव्याच्या निमित्ताने अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याचे नियोजन आमदार बबनदादा शिंदे, आमदार यशवंत माने, आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांच्या मार्गदर्शनानुसार या दौऱ्याचे नीटनेटके नियोजन करण्याची जबाबदारी शहर अध्यक्ष संतोष पवार आणि किसन जाधव यांच्यावर सोपविण्यात आलीय.
निवडीबद्दल किसन जाधव यांचे सर्व स्तरातून कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.