सोलापूर : भारतीय प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रम-उपक्रमांनी देशभरात सर्वत्र साजरा होतोय. याच वेळी भीम आर्मी सोलापूर शहराध्यक्षा विशाखा उबाळे यांनी बापूजी प्राथमिक प्रशाला येथे विद्यार्थ्यांना पेन व लाडू वाटप करून प्रजासत्ताकदिन साजरा केला.
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने, २६ जानेवारी रोजी शासकीय, निमशासकीय, शाळा महाविद्यालयांमध्ये अशा विविध ठिकाणी झेंडा वंदन करून विविध उपक्रम व कार्यक्रम घेत प्रजासत्ताकदिन साजरा केला जातोय.
यावेळी विशाखा उबाळे यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताकदिनाचे थोडक्यात महत्त्व सांगून सर्व चिमुकल्यांना लाडू भरवून हा आनंदोत्सव साजरा केला.
याप्रसंगी बापूजी प्राथमिक प्रशालेचे मुख्याध्यापक भारत गुणापुरे, शिक्षक-शिककेतर कर्मचारी तसेच भीम आर्मीचे प्रतीक डावरे, बिरू डांगे, देवा सुरवसे, लक्ष्मी माने आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.