Type Here to Get Search Results !

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनांचा घ्यावा शेतकऱ्यांनी लाभ


सोलापूर : जिल्ह्यात फलोत्पादन व भाजीपाला पिकांचे क्षेत्र तसेच उत्पादन वाढविण्याकरीता कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना राबविण्यात येत असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टल  http://mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डी. एस गावसाने यांनी केले आहे

एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम सन 2023-24 या योजनेसाठी जिल्हयास रक्कम रू. 1486.31 लाख कार्यक्रम राबविण्यास मान्यता प्राप्त झाली आहे . मंजुर कार्यक्रमापैकी अनुसूचित जाती प्रवर्गास रक्कम रू.88.87 लाख व अनुसूचित जमाती प्रवर्गास रक्कम रू. 63.87 लाख कार्यक्रम मंजूर आहे.

एकात्मिक फलोत्पादन  विकास अभियान अंतर्गंत ड्रॅगन फ्रूट, ॲवोकॅडो, सुटी फुले, मसाला पिके, फळबाग पुनरूज्जीवन, सामुहिम शेततळे, शेततळे अस्तरिकरण, शेडनेट हाऊस, हरतिगृह , प्लास्टिक मल्चिंग, डाळिंब पिकासाठी अँटी हेलनेट  कव्हर, मधुमक्षिक वसाहत, व मधुमक्षिका संच , ट्रॅक्टर 20 एच पी पर्यंत , पॉवर  टिलर ८ एचपी पेक्षा जास्त व कमी. पिक संरक्षण उपकरणे, पॅक हाऊस, पुर्व शितकरण  गृह, शीत खोली, शीतगृह,रेफरव्हॅन, रायपनिंग चेंबर,  प्राथमिक प्रक्रिया केंद्र एकात्मिक शीत साखळी, कांदाचाळ, स्थाई व फिरते विक्री केंद्र- शितचेंबरच्या  सुविधेसह, द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर व भाजीपाला रोपवाटीका  इत्यादी घटकांसाठी अनुदान देय आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी  लाभार्थी शेतकऱ्यांचे नावे स्वत:ची शेतजमीन असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक  आहे. जिल्हयातील अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टल http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधीत नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी.एस. गावसाने यांनी केले आहे.