सोलापूर : साेलापूर इलेक्ट्राॅनिक्स डिलर्स असाेसिएशन द्वारा इलेक्ट्राॅनिक्स, काॅम्प्यूटर, टेलिकम्युनिकेशन, हाेम अप्लायन्सेस, साेलार सिस्टम,फीटनेस इक्विपमेंटस् चे भव्य प्रदर्शन ‘‘इलेक्ट्राे 2024’’ चे आयाेजन करण्यात आलंय. इलेक्ट्रो प्रदर्शनाचं २४ वं वर्ष असून यंदाचं प्रदर्शन बुधवारी, २४ जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत साेलापूर महानगरपालिकेद्वारा स्मार्ट सिटी अंतर्गत इंद्रधनु जवळील निर्मित आठ एकर एक्झिबिशन ग्राऊंडवर आयाेजित केले असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष आनंद येमुल यांनी शनिवारी सकाळी, पत्रकार परिषदेत दिली.
यंदा इलक्ट्राे प्रदर्शनाचे शार्प हे मुख्य प्रायाेजक असून प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार दि. 24 जानेवारी राेजी सायं. 5.00 वा. वसंत जाेशी, बिझनेस हेड, शार्प बिझनेस सिस्टम्स् इंडिया लि. यांच्या शुभहस्ते व अजित बोर्हाडे, डीसीपी, पाेलीस आयुक्तालय, साेलापूर यांच्या उपस्थितीत संपन्न हाेणार असल्याची माहिती इलेक्ट्राे चेअरमन दीपक मुनाेत यांनी सांगितले.
७ दिवस चालणाऱ्या इलेक्ट्राे 2024 या प्रदर्शनाची साेलापूर व साेलापूरच्या आसपासचे सर्व ग्राहक या प्रदर्शनाची वाट पहात असतात. दरराेज दु. 4 ते रा. 9.30 व रविवारी स.11 ते रा. 9.30 पर्यंत चालणाèया या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एलईडी,फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, एअर कंडीशनर, म्युझिक सिस्टीम, वाॅशिंग मशीन, डिश टिव्ही, मायक्राेव्हेव ओव्हन, व्हॅक्यूम क्लिनर, एअर कंडीशनर, साेलर सिस्टीम, गॅस गिझर, माेबाईल, आय पॅड,टेलीाेन, मिक्सर,फुड प्राेसेसर, आटा चक्की, एअर कुलर, वाॅटर प्युरीायर, स्टॅबीलायझर,चिमणी हुड, काॅम्प्युटर, फीटनेस इक्विपमेंटस् इत्यादी या प्रदर्शनामध्ये उपलब्ध असतात. ग्राहकांना विविध नमुन्यात व विविध रंगात आकर्षक किंमतीत निरनिराळ्या याेजनांखाली वस्तू खरेदी करता येतात. तसेच फायनान्सच्या माध्यमातून शुन्य टक्के 0 % व्याज दराने कर्जाची उपलब्धता देखील केली जाते.
सेडा तर्फे आयाेजित केलेल्या इलेक्ट्राे 2023 ला स्टाॅल धारकांनी प्रचंड प्रतिसाद दिला हाेता. यावर्षी सुमारे 260 स्टाॅल्स् असणार असून सुमारे एक लाख पेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील. प्रदर्शनाचे यंदाचे खास आकर्षण म्हणजे प्री फॅब्रीकेटेड व कंपनी फिटेड स्टाॅल्स् असणार आहेत.
या प्रदर्शनामध्ये ठिकठिकाणी ग्राहकांना बसण्याची साेय, माेफत पार्किंग तसेच शुध्द पिण्याचे पाण्याची साेय व केलेली आहे. भेट देणाऱ्या ग्राहकांना दरराेज लकी व शेवटच्या दिवशी बंपर ड्राॅ काढण्यात येणार आहे.
सर्व स्टाॅल मध्ये जवळपास 400 विविध पदवीधर व एमबीए विद्यार्थ्यांना कंपनी कडून ट्रेनिंग देऊन ग्राहकांना माहिती देण्यात येणार आहेे. या प्रदर्शनाच्या संपूर्ण संयाेजनासाठी सेडाद्वारे विविधसमित्या कार्यरत आहे. यंदाचे प्रदर्शन हे वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि सुविधापूर्ण असणार आहे. धुळमुक्त प्रदर्शनासाठी संपूर्ण मैदान वर मॅटींग ची व्यवस्था करण्यात आली आहे. स्टाॅलधारक आणि प्रेक्षकांसाठी विविध साेई उपलब्ध करण्यात येणार असुन यामध्ये खवय्या साठी फुड काेर्ट इ. साेयी असणार आहेत. दिव्यांग व्यक्तिंना देखील प्रदर्शनअनुभवता येणार असुन त्यांच्यासाठी व्हील चेअरची विशेष साेय करण्यात आली आहे. प्रेक्षक आणि स्टाॅल धारक यांच्या सुरक्षिततेसाठी फायर ब्रिगेड तसेच सिक्युरिटी गार्डस ही नेमण्यात आले आहेत. सेडातर्फे प्रदर्शन दरम्यान दरराेज रक्तदान उपक्रम घेतला जाणार आहे. संपूर्ण प्रदर्शन जास्तीत जास्त कसे डिजीटल हाेईल, यावर संपूर्ण कटाक्ष असल्याचे आनंद येमुल यांनी सांगितले.
प्रर्दशनासाठी प्रशस्त मोफत पार्कींगची साेय व माहितीसाठी वेगळे काऊंटर व सहभागी स्टाॅलची माहिती क्युआर काेड द्वारे सर्वांना त्यांच्या माेबाईलवरच मिळण्याची साेय यंदा करण्यात आली आहे अशी माहिती इलेक्ट्राे चेअरमन दिपक मुनाेत यांनी दिली.
सेडातर्फे अनेक सामाजिक उपक्रम ही राबविण्यात येत असून त्यामध्ये सेडाच्या सभासदांच्या कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक व वैद्यकिय मदतही करण्यात येते. कर्मचारी प्रशिक्षणासह व्यवसाय वृध्दीसाठी कार्यशाळेचेही आयाेजन करण्यात येतात. या प्रदर्शनातही 4 स्टाॅल्स् सामाजिक संस्थांना उपलब्ध करुन दिले असून इच्छुक सामाजिक संस्थांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पत्रकार परीषदेस सेडाचे सचिव भुषण भुतडा, खजिनदार सुयाेग कालाणी व संचालक सर्वश्री गिरीश मुंदडा, यल्लप्पा भाेसले, बसवराज नवले व संस्थेचे माजी अध्यक्ष जितेंद्र राठी, शिवप्रकाश चव्हाण, खुशाल देढीया, ईश्वर मालू , काैशिक शाह , केतन शाह आदी उपस्थित हाेते.