सोलापूर : राज्यातील एकूण १७ लाख असलेल्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप संपूर्ण राज्यभरात तीव्रतेने होत असून याचा शासकीय कामावर परिणाम झाला असल्याचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे यांनी आजच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद समोरील पुनम गेट समोर बेमुदत संपासाठी उपस्थित असलेल्या बहुसंख्य कर्मचाऱ्यासमोर बोलत होते.
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि राज्य शासकीय, निमशासकीय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र यांच्या संयुक्तिक आदेशाने एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करून सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकूण १७ प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या मागण्याची नागपूरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्येच जाहीर करून सरकारी कर्मचाऱ्यांना उचित न्याय देण्याऐवजी सरकारी कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम करत असून या बेमुदत संपाबाबत योग्य तोडगा न काढता कर्मचाऱ्यांची दिशाभूल करीत आहे.