Type Here to Get Search Results !

मुख्याधिकारी चरण कोल्हे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध बडतर्फ कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू



मुख्याधिकारी चरण कोल्हे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध बडतर्फ कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू


सोलापूर : वैराग नगरपंचायतचे मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी गतवर्षी, २५ ऑगस्ट रोजी कायम सेवेतून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी, १८ डिसेंबरपासून आमरण उपोषणास प्रारंभ केला. या उपोषणकर्त्यांनी मुख्याधिकारी चरण कोल्हे यांच्यावर अनेक बेकायदेशीर कामे करून मोठी माया कमविली असून त्यांनी शासन निर्णय डावलून मनमानी सुरू केल्याचा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे.

वैराग ग्रामपंचायत वैराग, वैराग नगरपंचायत वैराग व तत्कालीन गटविकास अधिकारी शेखर सावंत (पंचायत समिती, बार्शी) व नगरपंचायत वैराग मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी संयुक्तरीत्या, ०२ नोव्हेंबर २०२१ रोजी कर्मचारी प्रामाणिक केलेली यादी ही यादी अनधिकृत व बेकायदेशीर केली असून ती यादी तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी आमरण उपोषणकर्त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर अन्य प्रमुख चार मागण्यांसाठी या बडतर्फ कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.

उपोषणकर्त्यामध्ये स्वप्निल विष्णू चौधरी, दत्तात्रय फुलचंद घोडके, शंकर वसंत ढेकळे, विक्रम विनायक दहिटणकर, बाळासाहेब नाना पांढरमिसे, लखन तुकाराम खांडेकर आणि सुशील सूर्यकांत बिरगे यांचा समावेश आहे या कर्मचाऱ्यांनी प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास प्रारंभ केला. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरू राहील असे उपोषणकर्त्यांनी सांगितले.