अपर पोलीस महासंचालक अंकुश शिंदे यांची सदिच्छा भेट
कासेगांव / संजय पवार : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे काल नाशिकचे पोलीस आयुक्त तथा नुकतीच अप्पर पोलीस महासंचालकपदी नियुक्त झालेले अंकुश शिंदे यांनी काल कासेगावला शुभेच्छा भेट दिली. याप्रसंगी धोत्रीचे माजी सरपंच कुंडलिक माने व कासेगावचे माजी सरपंच संजय चौगुले, संजय पवार, बापू चौगुले यांनी त्यांचे स्वागत केले.
सोलापूर पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी शिंदे यांनी कोरोना काळात यशस्वीरित्या पार पाडली होती. यानिमित्ताने पुंडलिक माने यांनी सांगितले की, कोरोणाच्या या काळामध्ये साहेबांनी अतिशय जिकिरीने रुग्णव्यवस्था आणि नियोजन केल्याचे सांगितले. याप्रसंगी शिंदे यांचा सत्कार आणि स्वागत संजय पवार यांनी केले.