सोलापूर : ४९ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा - २०२३ चे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने साहेब यांच्या शुभहस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मंगळवारी सकाळी मोठ्या उत्साही आणि जल्लोषमय वातावरणात पार पडला.
मंगळवारी, ०५ ते १० डिसेंबर या कालावधीत पोलीस मुख्यालय सोलापूर शहर व पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे आयोजित स्पर्धेत पुणे ग्रामिण, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर शहर व सोलापूर ग्रामीण या घटकांमधील एकुण ९०० पोलीस खेळाडू यांनी सहभाग घेतला आहे.
०५ डिसेंबर रोजी सकाळी ०८ वाजता ४९ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२३ उद्घाटन मशाल ज्योत प्रज्वलित करून पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, अप्पर पोलीस अधिक्षक (सोलापूर ग्रामिण) प्रितम यावलकर, उपायुक्त (मुख्यालय) अजित बोऱ्हाडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) दीपाली काळे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे व सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस निरीक्षक सोलापूर शहर व ग्रामिण व खेळाडू पोलीस अंमलदार उपस्थित होते.