सोलापूर : उद्योगपती दत्ताण्णा सुरवसे यांच्या मित्रपरिवारातर्फे अंत्रोळीकर नगर येथे निरुपणकार विवेक घळसासी यांचं निरुपण, दि. ०१ व ०२ जानेवारी रोजी सकाळी ०६ वा. आयोजित करण्यात आलं आहे. निरूपणकार घळसासी यांचे विषय क्र.१) प्रभु श्रीराम, विषय क्र.२) आदर्श प्रेरक चरित्र अशा दोन विषयावर मधुरवाणीतून व्याख्यानमाला होत असल्याची माहिती उद्योगपती दत्ताण्णा सुरवसे यांनी गुरूवारी सकाळी एका पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूरातील उद्योग क्षेत्रात अखंड कार्यरत उद्योगपती दत्ताण्णा सुरवसे यांच्या मित्रपरिवारातर्फे अंत्रोळीकर नगर परिसरात अथवा या भागात बहुसंख्य नागरिकांची मनापासून ईच्छा होती, की या परिसरात एक सुंदर असे व्याख्यानमाला व्हावा, या लोक इच्छेतून हे व्याख्यान होत आहे. सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा, साहित्य, उद्योग क्षेत्र अशा विविध क्षेत्राप्रमाणे दत्ता आण्णा सुरवसे यांचे कार्य महान असून नव्यानेच अध्यात्मिक विषय घेऊन सुरवसे परिवार आपल्यासमोर येत असल्याचे दत्ताण्णा सुरवसे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.
या पत्रकार परिषदेस नरेंद्र काटीकर, शुभदा देशपांडे, रवींद्र नाशिककर, अनिरुद्ध देशपांडे आदी उपस्थित होते.
विवेक घळसासी यांचा अल्प परिचय
१) पत्रकारीताः
घराण्यात तीन पिढ्या पत्रकारीता, १९७२ पासून नैमित्तीक स्वरुपात वृत्तपत्रलेखन, दै. लोकसत्ता, दै.लोकमत, दै. सकाळ अशा नेक वृत्तपत्रांमध्ये स्तंभ लेखन, मुंबईच्या दै. तरुण भारत मध्ये ४ वर्षे वृत्तसंपादक, सोलापूरच्या दै. तरुण भारतमध्ये १५ वर्षे मुख्य संपादक,
२)आजवर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांवर भाष्य करणारे १००० हून अधिक लेख प्रसिध्द. ग्रंथः- रेघोट्या काव्यसंग्रह, मज फुलही रुताने दोन अंकी नाटक, नित्य निरुपण इ ॥नेश्वरीवरील स्फूट लेख, भारतीयविचार साधना पुणे.
३) युवा चेतनाः
स्वामी विवेकानंद प्रकाशक रामकृष्ण मठ पुणे. १९८० पासून व्याख्याने, २००१ पासून पुर्णवेळ व्याख्याने व प्रवचणे,
४) वक्तृत्व :
आखील भारतीय मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादक सहभाग, दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्र, कर्नाटक राज्यात मराठी आणि अमराठी क्षोत्यांसाठी अनेक व्याख्याने, भारतीलय तत्वज्ञान संत कार्याविषयी युरोपीय देशांमध्ये केवळ युरोपीय लोकांसाठी सलग सहा महिने प्रवास- व्याख्याने चर्चासत्रे मराठी आणि हिंदीतजून श्रीमद् भागवत सप्ताह, तसेच श्रीरामचरितमानस सप्तांहाचेही अनक ठिकाणी आयोजन होत असते. गेल्या दोन तपाहून अधिक काळात तीनएकहजार व्याख्याने दिली.
५) सहयोगः अध्यक्ष, दैनिक तरुण भारत, सोलापूर, चॅनल प्रमुख, टी.व्ही. चॅनल वृत्तवेध सोलापूर, ज्ञानप्रबोधनी सोलापूर, सुयश गुरकुल, लोकमंगल उद्योग समुह.