Type Here to Get Search Results !

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. मनोहर पवार यांच्या स्मृतिदिनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप



ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. मनोहर पवार यांच्या स्मृतिदिनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप

कासेगाव /प्रतिनिधी : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी उपसभापती मनोहर (अण्णा) पवार यांच्या ८ व्या स्मृतिदिनी, जिल्हा परिषद शाळा, बिरोबा वस्ती येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

उळे केंद्राच्या केंद्रप्रमुख ज्योती यादव यांच्या हस्ते सर्वप्रथम स्व. अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कासेगांव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रामहरी चौगुले, संजय चौगुले, गजेंद्र चौगुले, मोहन रेड्डी, नागनाथ क्षिरसागर, बापू वाडकर, लता शिंदे, रमजान मकानदार, आप्पा तांबोळी, बापू चौगुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना रामहरी चौगुले यांनी सांगितले की, अण्णांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही तयार झालो. त्यांचा स्वभाव स्पष्ट, निश्पृह, निर्व्यसनी अशी ओळख आम्हाला प्रेरणादायी ठरली. यामुळे आम्ही आमची स्वतःची ओळख निर्माण करू शकलो. एक स्वातंत्र्य सैनिक असूनही पेन्शन नाकारणारे एकमेव उदाहरण म्हणून अण्णा होते. आदर्श व्यक्तिमत्व होते. तालुका पंचायत समितीचे उपसभापती असताना शासकीय गाडीही नाकारून सायकलवरून प्रवास करणारे अण्णा हे आमच्यासाठी खूपच प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. 

त्यांच्या संदर्भात बोलावं तेवढं थोडं असून त्यांचा गांधीवाद स्पष्ट स्वभाव व मनमिळाऊ व्यक्तिमत्व यामुळेच ते सर्वांचे आपलेसे वाटत होते. अण्णांच्या राजकीय पटलावरचा प्रवास पाहता, त्यांच्या सहवासामध्ये आमचे वडील स्व. ज्ञानोबा चौगुले, स्व. बाजीराव जाधव, स्व. नागनाथ वाडकर, लिं. अप्पा स्वामी, भगवान शंकर कासार, धर्मराज वाडकर, शंकर भोज, बाबुलाल तांबोळी यांच्यासारख्यांना त्यांचा सहवास लाभला. ही सर्वपरिचित व्यक्ती गावासाठी खूपच प्रेरणादायी असल्याचं सामाजिक कार्यकर्ते रमजानभाई मकानदार यांनी सांगितलं. 



अध्यक्ष भाषणात श्रीमती ज्योती यादव म्हणाल्या की आज माझं मी भाग्य समजते की, एका निष्प्रह आणि सुसंस्कृत अशा व्यक्तीची ओळख मला शाळेमुळे अनुभवता आली. स्व. अण्णांसारखे अनेक विद्यार्थी त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन तयार होत अशी आशा श्रीमती यादव यांनी व्यक्त केले तर सौ लता शिंदे यांनी अण्णा बद्दलचा वाचनातला अनुभव त्या ठिकाणी विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना सांगितला. वाचनातूनच बुद्धी आणि विचाराचा विकास होतो व ते मला स्वतः त्यांच्या वाचनाच्या आवडीतून दिसून आले. अण्णांनी अनेक पुस्तकही मला वाचण्यासाठी दिली होती, ती मी आजही जपून ठेवल्याचे त्यांनी सांगितलं.



यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम कोळी यांनी स्व. अण्णांविषयी आपला परिचय नव्हता. त्यांच्या केवळ ग्रामस्थांच्या- परिचयाच्या ओळखीवरून अण्णा हे एक आदर्श व्यक्तिमत्व गावाला लाभल्याचं कोळी सर व तसेच सहशिक्षक राजशेखर बुरकुले सर यांनी त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला. 

यावेळी अण्णांचे चिरंजीव तथा पत्रकार संजय पवार यांनी अण्णांचा संपूर्ण जीवनपट ग्रामस्थांसमोर मांडला. त्यांचं बालपण, शालेय शिक्षण, सामाजिक, राजकीय प्रवासाचा उलगडा, भ्रष्टाचार विरोधी मोहीम तसेच स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग याविषयीच्या आठवणींना संजय पवारांनी उजाळा दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद शाळा बिरोबाची शिक्षक राजशेखर बुरकुले यांनी केले तर कोळी सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. यावेळी शालेय विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.