जयसिंगपूर : येथील छत्रपती जयसिंग महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या दुरावस्था तसेच घर फाळा वाढ रद्द करावी, या मागण्यांचे निवेदन जयसिंगपूर नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी सौ. प्रमिला माने यांना शुक्रवारी देण्यात आले.
जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळेकर साहेब यांना भेटून पुतळ्याच्या दुरावस्थेकडे नगर परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी, १६ जानेवारी रोजीपासून करण्यात येत असलेल्या उपोषणासंबधी निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी सुदर्शन कदम, आदम मुजावर, इकबाल सुदरणे व विशाल कांबळे यांच्यासह अन्य सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळेकर यांनी, त्या निवेदनासंबंधी तातडीने नगरपालिकेस या पुतळ्यांचे निवेदनावर त्वरित योग्य ती कार्यवाही करावी, तसेच आम आदमी पार्टीस उपोषणापासून परावृत्त करावे, याबाबतचे पोलीस स्टेशनकडून नगरपालिकेत त्वरित पत्र देण्याबाबतच्या सूचना दिल्या. या दोन्ही मागण्यांवर नगरपरिषदेकडून सकारात्मक कृती न घडल्यास आम आदमी पार्टीच्या वतीने 16 जानेवारीपासून उपोषण करण्यात येणार असल्याचे सुदर्शन कदम यांनी सांगितले.