प्रतिनिधीत्व करीत असलेल्या खेळाडूस ' असं ' ही प्रोत्साहन
सोलापूर : सोलापूर शहराची कन्या भुवनेश्वरी सुरेश जाधव ही आंतरराष्ट्रीय कराटे अथॉलीट असून गत ०२ वर्षापासून तिने भारताचे प्रतिनिधित्व जागतिक स्तरावरील कराटे वन सिरीज कराटे प्रीमियर लीग यामध्ये करीत आहे, या आंतरराष्ट्रीय खेळाडूस सोलापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने पुढील कार्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते ५० हजार रुपयांचा धनादेश प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात आला.
वर्ल्ड कराटे फेडरेशनच्या टॉप १०० सूचीमध्ये ६५ किलो वजनी गटातील ५७ व्या स्थानावरील आलेली ही एक मात्र ही पहिली अथॉलीट स्पर्धक आहे. तसेच दिनांक २४ ते २९ ऑक्टोबर २०२३ रोजी बुडापेस्ट हिंगेरी येथे झालेल्या वर्ल्ड कराटे चॅम्पियनशिपसाठी तिची निवड झालेली असून ही बाब कौतुकस्पद आहे. कु भुवनेश्वरी सुरेश जाधव हिची निवड 26 th WKF Senior world chaimpainship Budapest 2023 पात्र झाली. असून त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकडून कु. भुवनेश्वरी जाधव हिला प्रोत्साहन भत्त्याचा धनादेश प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, वरिष्ठ श्रेणी लिपिक मल्लेश नराल, संगीता जाधव, मिहीर जाधव, शहर भाजप क्रीडा प्रकोष्टा यशवंत पाथरूट आदी मान्यवर उपस्थित होते.