Type Here to Get Search Results !

विशेष शिक्षक भगवान चौगुले यांना शासनाचा दिव्यांग क्षेत्रातला पुरस्कार



विशेष शिक्षक भगवान चौगुले यांना शासनाचा दिव्यांग क्षेत्रातला पुरस्कार

धाराशिव :  धाराशिव जिल्हा परिषद, समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांगाच्या उन्नतीसाठी दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल अतिरिक्त जिल्हाधिकारी शिंदे, उपमुख्य कार्यकारी शाम गोडभरले यांच्या हस्ते स्वामी समर्थ मूकबधिर शाळेतील विशेष शिक्षक भगवान धर्मा चौगुले यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आलं.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांवचे सुपुत्र भगवान चौगुले यांचं दिव्यांग क्षेत्रातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला-क्रिडा, साहित्य काव्यलेखन, जनजागृती उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन चौगुले यांचं गौरव करण्यात आला.



यापूर्वी रोटरी क्लब धाराशिव; स्वामी समर्थ अपंग सेवा मंडळ सोलापूर; लोकमंगल फाऊंडेशन धाराशिव; सरदार सचदेव फाऊंडेशन मुंबई; धनेश्वरी शिक्षण संस्था धाराशिव या संस्थेच्यावतीने चौगुले यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. "मोरपीस" व" जय हो "ही दोन काव्यसंग्रह तर "चांदण्यातला प्रवास" हा गौरव विशेषांक प्रसिद्ध झाला आहे. तसेच " तूच तुझ्या जीवनाचा  "शिल्पकार" " सहल निघाली" " नमामि गंगे" " दप्तरमुक्त शाळा-अभिरुप न्यायालय" या हस्तपुस्तिका प्रकाशित झाल्या आहेत. 



अखिल भारतीय साहित्य संमेलन धाराशिव येथे कवी कट्टा मंचावर सुत्रसंचालक व पहिले अखिल भारतीय बालनाट्य संमेलन, सोलापूर येथे कार्यालयीन समिती सदस्य म्हणून विशेष शिक्षक चौगुले यांनी काम केले आहे. तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात दिव्यांग विद्यार्थ्यांना बालनाट्य लेखन व दिग्दर्शन करून व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. 



सिव्हिल हॉस्पिटल धाराशिव यांच्या "जागतिक अवयवदान दिन" अभियानात लेखन दिग्दर्शनसह सहभाग तसेच निवडणूक आयोगाचा दिव्यांग मतदार जनजागृती अभियानात लेखन दिग्दर्शनसह सहभाग आदी योगदानाची दखल यावेळी शासनाकडून घेण्यात आली.

भगवान चौगुले हे जिल्हा परिषद शाळा, कासेगांव व बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशाला, कासेगाव तसेच लाल बहादूर शास्त्री प्रशाला, सोलापूर, दयानंद महाविद्यालय सोलापूर येथील चौगुले हे माजी विद्यार्थी आहेत. या यशाबद्दल त्यांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.