धर्मण्णाच्या निधनाने मनाला वेदना झाल्या : वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी आ.उल्हास पवार
सोलापूर : माजी खासदार धर्मण्णा सादूल हे माझं जुने स्नेही होते, त्यांचा आणि माझा सहवास हा पन्नास वर्षांहून अधिक काळापासून आहे. त्यांच्या युवक काँग्रेसच्या राजकीय सहवासात त्यांना जवळून पाहण्याचा योग आला. ते नगरसेवक, महापौर, खासदार असा विविध पदांवर काम करत असताना त्यांनी आपल्यातील संयमपणा सोडला नाही. ते सातत्याने सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी प्रयत्नशील असत. अशा या माझ्या मित्राचं अकाली निधन झाल्याचं वृत्त मनाला वेदना देणारी आहे, असं महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा विधान परिषदेचे माजी आमदार उल्हास पवार यांनी केले.
ते मंगळवारी सायंकाळच्या सुमारास विजयनगर येथील धर्मण्णा सादूल यांचं निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वन केले. यावेळी त्यांनी शोकसंदेशात त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी कै. धर्मण्णा सादूल यांना अभिवादन करण्यात आले.