सोलापूर : बज्म-ए-गालिब सोलापूरतर्फे सालाबादप्रमाणे घेण्यात आलेल्या आंतरशालेय बाल नाट्य स्पर्धेत के. बी. एन. उर्दू प्रशालेच्या मुजम्मिल शेख लिखित व दिग्दर्शित "दौड़" या बाल नाट्येस तिसरे पारितोषिक तसेच उत्कृष्ट अभिनयासाठी रेहान रोझेवाला यास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
बज्म-ए-गालिब सोलापूरतर्फे घेण्यात आलेल्या आंतरशालेय बाल नाट्य स्पर्धेत एकूण ०९ शाळांनी भाग घेतला. के. बी. एन. उर्दू प्रशालेच्या मुजम्मिल शेख लिखित व दिग्दर्शित "दौड़" या बाल नाट्यात रेहान रोजेवाले, सुफियान शेख, मौला अली डोंगरी, सादिक पठाण, अयान मुल्ला, झीशान पीरजादे, जुबेर नदाफ, एजाज हिरोली, ओवेश शेख, डोंगरी अय्युब, शेख इब्राहिम, शेख मुजीब, गोगी सोहेल या कलाकारांनी आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखविले.
झैद अबुलहसन शेखनी संगीत, देवदत्त सिद्धमने प्रकाश योजना व अंजुम लालकोट, फ्जनान नाईकवाडी, अब्दुल कादर लालकोट, शिवकुमार कल्याणी, नर्गिस शेखने नेपथ्यानं सजवत गती दिली.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नसीम लालकोट, जावेद लालकोट, सचिव समीर बडेपीर, मुख्याध्यापिका शाहेदा लालकोट, साबीर लालकोट, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी-पालक व सर्व विद्यार्थ्यांनी या चमूचे अभिनंदन केले.