Type Here to Get Search Results !

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सोमवारी दिव्यांग संसदेचे आयोजन


सोलापूर : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांनी सोमवारी, ०४ डिसेंबर रोजी  जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृह येथे दिव्यांग संसद आयोजित केली आहे.

०३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खामितकर यांच्या  संकल्पनेतून दिव्यांग संसदेचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे तसेच जिल्हा सेवा प्राधिकरण सचिव न्यायमूर्ती नरेंद्र जोशी यांच्या हस्ते  हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व दीप प्रज्वलनाने होणार आहे.

कार्यक्रमाचे प्रस्तावना जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर करणार आहेत त्यानंतर संसदेस मार्गदर्शन न्यायमूर्ती नरेंद्र जोशी दिव्यांग अधिनियम २०१६ बाबत मार्गदर्शन करणार आहेत.

अॅड.लक्ष्मण मारडकर विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत दिव्यांगाना देण्यात येणाऱ्या मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन करणार आहेत.   तसेच रामचंद्र शिंदे व्यवस्थापक जिल्हा उद्योग व प्रशिक्षण केंद्र  दिव्यांगासाठी असणारे लघु व सूक्ष्म उद्योग व त्यासाठी लागणारे भांडवल उभारणी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे समन्वयक प्रीती पारकट्टी या दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध कर्ज योजना  याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. प्रतीक धनाळे व्यवस्थापक हे अग्रणी बँक मार्फत राबवण्यात येणाऱ्या दिव्यांगांच्या विविध कर्ज योजना याबाबत मार्गदर्शन करणार आहेत देवळे हे दिव्यांगासाठी असणाऱ्या कौशल्य विकास व स्वयंरोजगार याबाबत मार्गदर्शन करणार आहेत, तसेच तहसिलदार संजय गांधी निराधार योजनेबाबत माहिती देणार आहेत.

जिल्हा शल्य चिकित्सक हे यु डी आय डी बाबत मार्गदर्शन करणार आहेत. सच्चिदानंद बांगर हे दिव्यांगासाठी असणाऱ्या विविध शासकीय योजनेवावत माहिती देणार आहेत.कमलाकर तिकटे  राष्ट्रीय न्यास अधिनियम १९९९ बाबत मार्गदर्शन करणार असून दिव्यांगांच्या प्रत्येक प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळण्यासाठी विविध विभागांमध्ये दिव्यांगांना येणारे अडचणी सोडवण्यासाठी त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यासाठी संवाद या संसदेच्या माध्यमातून साध्य करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सच्चिदानंद बांगर हे करणार आहेत.  सूत्रसंचालन राजू शेळके हे करणार आहेत.