इस्लामपूर : एखाद्या ऐतिहासिक महापुरुषाच्या जयंतीला डीजे डॉल्बी लावून नाचणे आणि डोकं बंद करणे, हे त्या महापुरुषाचा सन्मान असत नाही, याउलट या देशासाठी संपूर्ण समाजासाठी त्या महापुरुषाने जे योगदान दिले, हे आपण समजून घेणे व समाजाला समजावून सांगणे, ही त्या महापुरुषाला दृष्टीने खरी आदरांजली आहे, असे प्रतिपादन कॉम्रेड धनाजी गुरव यांनी केले.
स्वातंत्र्य सेनानी टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त इस्लामपुरात कौमी एकता रॅली काढण्यात आली होती. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कॉ. धनाजी गुरव बोलत होते.
काही लोक टिपू सुलतान च्या एकंदरीत इतिहासावर जळतात. त्यांना टिपू सुलतानचे नाव सुद्धा सहन होत नाही, त्याचे खरे कारण या देशात इंग्रजाचे राज्य येऊ नये आणि हा देश अखेरपर्यंत भारत राहावा, यासाठी टिपू सुलतान हा इंग्रजांशी लढून शहीद हुतात्मा झालेला नेता आहे, असे सांगून कॉ. गुरव यांनी इंग्रजाचे तळवे चाटणे, माफी मागणे हा ज्यांचा इतिहास आहे, त्यांनाच टिपू सुलतान हे नाव सुध्दा सोसत नाही, असेही त्यांनी म्हटले.