महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे झाला. आपला भारत देश हा मुख्यतः समाज, जाती, धर्म यावर आधारलेला असून याला मुळचा रस्ता दाखवण्यासाठी समाजसुधारकांचे सर्वात मोठे योगदान आहे. या संपूर्ण देशात महाराष्ट्रातील सर्वात जास्त समाजसुधारक होऊन गेलेत. असेच एक थोर महात्मा म्हणजेच ज्योतिराव गोविंदराव फुले हे क्रांतीसुर्य महात्मा फुले नावाने प्रसिद्ध. ते मराठी लेखक विचारवंत आणि समाज सुधारक होते. त्यांनी 'सत्यशोधक समाज' संस्था स्थापन केली.
शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना 'महात्मा' ही उपाधी १८८८ मध्ये बहाल केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी 'शेतकऱ्यांचे आसूड' हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता.
स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे
महात्मा फुले हे पहिले भारतीय शिक्षक होते.
मराठा सेवा संघाच्यावीने २८ नोव्हेंबर हा खरा शिक्षकदिन म्हणून त्यांचा स्मृतीदिन संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. अशा या थोर महात्मा जोतीराव फुले यांना त्यांच्या १३३ व्या स्मृतिदिना निमित्त मराठा सेवा संघ, संभाजी बिग्रेड, जिजाऊ बिग्रेड व ३२ कक्षाच्यावतीने विनम्र अभिवादन...!
सर्व शिक्षक बांधवांना आजच्या खऱ्या शिक्षकदिनाच्या शुभेच्छा.
शिवश्री इंजिनिअर उत्तमराव दत्तात्रय माने
शिवमती अक्काताई उत्तमराव माने
मराठा सेवा संघ परिवार