सोलापूर /२३ : येथील बुधवार पेठ-मिलिंद नगरमधील रहिवासी मिलिंद विठ्ठलराव सरवदे यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले.काही दिवसापूर्वीच त्यांच्यावर बायपास सर्जरी झाली होती. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झालं. ते मृत्यू समयी ६३ वर्षांचे होते.
ते पूर्वी नागरी सहकारी बँकेमध्ये अधिकारी पदावर कार्यरत होते. आंध्र प्रदेशातील पिठापूर येथील श्रीपाद ट्रस्टचे ते संचालक होते. त्यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, असा परिवार आहे. बहुजन समाज पार्टीचे सोलापुरातील माजी प्रभारी राहुल सरवदे यांचे ते कनिष्ठ बंधू होत.