पंढरपूर ६५ एकरमधील त्रास थांबवा; उपमुख्यमंत्र्यांना भाविक-वारकरी मंडळाचं निवेदन

shivrajya patra
पंढरपूर : ६५ एकर मधील प्लॉट संदर्भातील त्रास संपवून भाविकांना वारी कालावधीमध्ये नित्यनेम करणेसाठी सहकार्य करावे, असे निवेदन पंढरपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ह. भ. प. सुधाकर महाराज इंगळे यांनी अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून दिले. त्यावेळी या प्लॉट वाटप संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी भाविक-वारकऱ्यांच्या मंडळाला दिले.

श्री क्षेत्र पंढरपूर येथे वर्षभरात चार वारीला वारकरी भाविक ६५ एकर मधील प्लॉट घेऊन तीन ते पाच दिवस नित्य नेम करणेसाठी मुक्कामी राहतात. तेथे भजन कीर्तन प्रवचन इ. कार्यक्रम करतात. तो आनंद स्वर्गातही नाही, अशी वारकरी-भाविकांची धारणा आहे. पूर्वी नदी वाळवंटामध्ये हे सर्व कार्यक्रम केले जात होते, ते सर्व जण तेथेच रहात होते. परंतु स्वच्छतेचे कारणसमोर करून सर्वांना ६५ एकर मधील प्लॉटमध्ये राहण्यासाठी ती जागा खुली केली आहे, असे कोर्टात सांगण्यात आले आहे. 

प्रत्येक वारीला तीन महिन्यातून एकदा प्लॉट घेणेसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागतो. प्रत्येक वारीला त्या जागेवर दिंडी वेगवेगळी असते. सध्या प्रत्येक वारीला प्रत्येक दिंडीला वेगवेगळा प्लॉट देण्यात येत आहे. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भविकाना मंडप सापडणे कठीण होते आहे. ६५ एकर मधील प्लॉट घेणेसाठी वारकरी भविकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

एका दिंडीला फक्त तीन दिवस तो प्लॉट अपेक्षीत आहे. त्यामुळे ६५ एकर मधील प्लॉट हा त्या-त्या दिंडीला कायमस्वरुपी निश्चित करण्यात येऊन अर्ज एकदाच घेऊन त्यांची नोंद कायमस्वरुपी करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन ह भ प सुधाकर महाराज इंगळे यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिले. या प्लॉट वाटप संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी भाविक-वारकऱ्यांच्या मंडळाला दिले.


To Top