... दिपोस्तवाशी घातलेली सांगड दर्शवते आपल्या संस्कृतीची प्रगल्भता : मोहन दाते

shivrajya patra
श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळतर्फे वसुबारस साजरी

सोलापूर : आपल्या पूर्वजांनी गो, धनाचे ओळखलेले महत्व वसूबारसनिमित्त गोमातेची पूजा आणि नेवद्य द्वारे त्यांचे महत्व अधोरेखित करण्यासाठी दिपोस्तवाशी घातलेली सांगड ही आपल्या संस्कृतीची प्रगल्भता दर्शवते, असे मत या वेळी प्रमुख पाहुणे पंचागकर्ते मोहन दाते यांनी व्यक्त केले.

बाळीवेस येथील श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळतर्फे वसू बारस उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. येथील श्री मंदिर प्रांगणात नागणसुरचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य  महास्वामीजी यांच्या हस्ते गाय आणि वासरूचे विधिवत पूजन करण्यात आले. 

या कार्यक्रमास सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांची  विशेष उपस्थिती होती. मंडळाचे उत्सव समिती अध्यक्ष शशिकांत बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात गाय आणि वासरूस दाळ, गुळ तसेच गोडधोडाचे नेवद्य दाखवण्यात आले.

जमलेल्या भाविक भक्तांनी गाय आणि वासरूचे दर्शन घेतल्या नंतर गोमातेची परिसरात मोठ्या थाटात मिरवणूक काढण्यात आली. या वेळी परिसरातील महिला वर्गाने आपल्या दारा समोर मिरवणूक आल्यावर गोमातेची पूजा केली. नैवेद्य दिला. या कार्यक्रमाचे पोरोहित्य वेदमूर्ती गिरी स्वामी, सिद्धू स्वामी, विशाल स्वामी यांनी केले.

या कार्यक्रमास कसबा गणपती मंडळाचे विश्वस्त केदार मेंगाणे, बीप्पीन धुम्मा, श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब भोगडे, आनंद मुस्तारे, संदेश भोगडे, चिदानंद मुस्तारे, मंडळाचे उत्सव उपाध्यक्ष सिद्धार्थ खुने, अमोल साखरे, उत्सव सचिव सागर मुस्तारे पुष्कराज मेत्री, सुरज गुंगे, योगीराज भोगडे, विकास धुम्मा, विनायक शरणार्थी आदींची प्रमुख उपस्थित होती.

........ चौकट ..........
ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावी, यासाठी मंडळाचे प्रयत्न प्रशंसनीय :श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी 

दीपोत्सवाची सुरुवात ही वसूबारस ने होते. यानिमित्त 'गो धन' ची पुजा बळी राजा अर्थात शेतकऱ्यामार्फत करण्याची परंपरा आहे. शहरात ही परंपरा अखंडित राहावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावी, याकरिता मंडळाने सुरू केलेले प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन नागणसुरचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
To Top