Type Here to Get Search Results !

आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत अन् पर्यावरण संवर्धनाकरिता फळझाडांचे वाटप

एचडीएफसी बँक आणि परिवर्तन समूह संस्थेचा पथदर्शी उपक्रम

सोलापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत वाढविणे तसेच पर्यावरण संवर्धनाकरिता एचडीएफसी बँक आणि परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे शेतकऱ्यांना फळझाडांचे वाटप करण्यात आले. 

एचडीएफसी बँक गो ग्रीन ऑक्टोबर २३ प्रोजेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यातील ३०० शेतकऱ्यांना फळझाडे वाटप करण्याचा संकल्प असून ग्रामपंचायत कोंडी येथे परिवर्तन समूह एचडीएफसी बँक यांच्या सहयोगाने राबवलेल्या उपक्रमात सरपंच सौ. सुहासिनी निंबाळकर, उपसरपंच शिवाजी नीळ यांच्या हस्ते ३५०० फळ झाडांचे वाटप करण्यात आले.
शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत वाढविणे त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाकरिता सोलापूर जिल्हा प्रशासन व ग्राम पंचायत  कोंडी यांच्या मदतीने परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्थेने शेतकऱ्यांना फळझाडाचे वाटप करण्यात आले.

यावेळी एचडीएफसी बँकेचे अधिकारी, परिवर्तन समूहाचे अधिकारी गणेश पाटील, वामन भोसले, प्रकाश भोसले, प्रसाद नीळ, ग्रामसेवक कांबळे व शेतकरी बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.