संस्कार संजीवनी अनाथालयात पार पडला आनंद सोहळा
सोलापूर : कोणीच 'नाही रे' वर्ग म्हणून समाजात दुर्लक्षित असलेल्या अनाथ बालकांच्या जीवनात दिवाळीचा आनंद वाटण्याच्या उद्देशाने संस्कार संजीवनी फाउंडेशन, मौजे हगलूर अनाथालय वैदु समाज भटक्या विमुक्त सामाजिक बहुउद्देशीय संस्था, यांच्यावतीने अनाथ बालकांना दिवाळीनिमित्त फराळ व फटाके देऊन साजरी करण्यात आली. त्या सर्व बालकांसाठी ही दिपावली, दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारी ठरली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने, अनाथालयात 'दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा' अशा आनंदमय दिवाळीनिमित्त ३२ अनाथ बालकांना फराळाचे साहित्य, मिठाई आणि फटाके देण्यात आले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे दिसून आले.
या कार्यक्रमास बिराजदार सर, संजय गायकवाड, अविनाश मुदगल, खंडू कुंभार, हमीद शेख (कासेगांव), ज्ञानेश्वर जाधव यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र शिरकूल, सचिव विवेक कन्ना आणि संस्थेचे इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा आनंदमय सोहळा पार पडला.
याप्रसंगी सुरज शिरकूल, राजू हुंडेकरी, अविनाश मुळे, श्रीनिवास कोटा आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी काळे सर (हगलूर) यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.