सर्वपक्षीय नवसरंजामदार मराठा नेते हे गरीब मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे शत्रू आहेत, त्यांना गरीब मराठा समाजाबद्दल कसलेही प्रेम नाही, सुमारे ५५ गरीब मराठा तरुणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या तरी यांचे मन हेलावत नाही, फक्त ते गरीब मराठा समाजाकडे मतदार म्हणून पाहतात, त्यांचे कल्याण व्हावे, यासाठी त्यांना आरक्षण द्यायची मानसिकता त्यांची नाही.
ते गरीब मराठा समाजाला गृहीत धरून त्यांच्यावर राज्य करतात. आपल्यानंतर आपला मुलगा, मुलगी, नातू यांना सत्तेत कसे सेटल करायचे, यासाठी ते तत्पर आहेत, पण गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ते सतत वेळकाढूपणा करत आहेत.
झालेली सर्वपक्षीय आरक्षण मीटिंग म्हणजे नवसरंजामदार मराठा नेत्यांनी गरीब मराठा समाजाला कशी टोपी घालायची याचे केलेले नियोजन आहे. विशेषतः "ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता....." अशी भाषा वापरणाऱ्या बहुतेक नव सरंजामदार मराठा नेत्यांकडे ओबीसी दाखले आहेत. म्हणजे स्वतः आरक्षणाचे लाभार्थी व्हायचे पण गरीब मराठा समाजाला वंचित ठेवायचे, हे पद्धतशीर षडयंत्र नव सरंजामदारांनी रचले आहे.
- डॉ. श्रीमंत कोकाटे