आज (सोमवारी) दुपारपासून मराठवाड्यात,बीड जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागले असल्याच्या बातम्या येत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी आजमितीला आमरण उपोषण करून प्राणाची बाजी लावलेले मनोज जरांगे-पाटील हे आंदोलन शांततेत करा, असे तळमळीने सांगत असताना कोपर्डी प्रकरणात संपूर्ण राज्यात लाखोंचे मूक-मोर्चे काढणारा आणि १४ ऑक्टोबरची आंतरवली-सराटा येथील कोटींच्या गर्दीची सभा शांततेत पार पाडणारा सकल मराठा समाज,ज्या समाजाने जरांगे-पाटलांकडे एकहाती नेतृत्व सोपवणारा समंजस, शांतताप्रिय, महाराष्ट्राचा मूळ भूमिपुत्र असलेला, महाराष्ट्रातील इतर समाजाला थोरल्या भावाच्या भूमिकेतून वागवणारा मराठा आज अचानक हिंसक कसा होऊ शकतो ?
हे सारं षडयंत्र आहे, हे नक्की...आरक्षणाच्या मूळ मागणीला बगल देण्यासाठी, मराठा समाजाला बदनाम करून अन्य जाती-जमातींना चिथावण्यासाठी सुरू असलेले हे कृष्ण-कारस्थान आहे. तेव्हा मराठ्यांनी आता रात्र वैऱ्याची आहे, हे लक्षात घेऊन एकीकडे आंदोलनाची धार कायम ठेवून त्याची तीव्रता वाढवताना त्याच वेळी हिंसक कृत्य कोण करतंय आणि कुणाच्या चिथावणीमुळे ज्या-ज्या ठिकाणी घडतंय, त्या-त्या ठिकाणी डोळ्यात तेल घालून अहोरात्र सजग रहाणं गरजेचं आहे.
कारण आता मात्र खरंच रात्र वैऱ्याची आहे...
आता छुप्या दुष्मनांचा देखील बुरखा फाडणे गरजेचे आहे !
एक मराठा लाख मराठा... !
नव्हे
तर आता
एक मराठा कोटी-कोटी मराठा ..!
विवेक शं. येवले, करमाळा
३० ऑक्टोबर २३- ९४२३५२८८३४
(शिवभार : मराठा सेवा संघ, सोलापूर वॉटस् अॅप ग्रुप वर जिजाऊ ब्रिगेडच्या शिवमती नंदा शिंदे यांनी शेअर केलेला मजकूर)