... मुजोरी फक्त गरिबाला दाखवणार का ?

shivrajya patra
या मुलाचं नाव बंटी घुटन हा मला आज पनवेल ट्रेनच्या लेडीज डब्यात हुंदके देत रडताना दिसला, कोणी पाहू नये म्हणून तोंड लपवत होता..मी मुद्दाम त्याच्या जवळ जाऊन का रडतोय ते विचारलं..तर त्याने सांगितलेलं कारण ऐकुन धक्काच बसला...हा मुलगा ट्रेन मध्ये कानातले..बांगड्या विकण्याचा धंदा करतो..याच्या कमाई वर याच घर चालत...वडील वारले आहेत घरी दोन लहाण भावंड आहेत आई आजारी असते त्यामुळे संपूर्ण घराचा भार या मुला वर आहे याच वय अवघ 16 वर्षाच, कुठे राहतोस विचारलं तर म्हणाला ठाण्यात शिवाजी नगर मध्ये.. कल्याण रेल्वे पोलिसांनी याचा साडे नऊ हजाराचा माल जप्त केला व अडीच हजार भरल्याशिवाय माल परत मिळणार नाही अस सांगितल आहे पोलिसांनी, याच्या जवळ एकही रुपया नाही.याचा मित्र पनवेल मध्ये कानातले बांगड्या विकायचा धंदा करतो म्हणून हा उसने पैसे मागायला त्याच्या कडे जात होता..का रडतोस विचारलं तर बोलला माझा माल पोलिसांनी जप्त केला ,अडीच हजार रुपये दिल्या शिवाय माल परत मिळणार नाही, माझ्या कडे पैसे नाहीत असे सांगितलं तर ते बोलले तुला दोन दिवसाची मुदत देतो, जर पैसे आणले नाहीस तर माल विसर, पोलीस माल विसर बोलल्यावर याने गयावया केल्या परन्तु त्या पोलिसांना याची दया आली नाही उलट त्यांनी या गरीब मुलाला मारहाण केली..याच कारण एकच या मुलाचे हप्ते त्या लाचखोर लोकांपर्यंत पोहचले नव्हते... मुजोरी फक्त गरिबाला दाखवणार का ? हिम्मत असेल तर एखाद्या बलवान माणसाला दाखवा...आत्ता काहीजण बोलतील कि हा ट्रेन मध्ये माल विकत होता ते अनधिकृत आहे..माल विकत होता चोरी नव्हता करत..दुनियेत कितीतरी फ्रॉड भरलेत त्याना पकडायचा सोडून या गरिबाला त्रास का...जर तुम्हाला वाटलं तर शेअर करा आणि या बंटी ला न्याय मिळवून द्या !

(शिवभार : सीमा भोईर यांच्या टाईमलाईनवरून 
रूक्मिणी परब यांनी शेअर केलेला मजकूर)
To Top