... हॉस्पिटलमधील सिटीस्कॅन मशीन पूर्ववत सुरू करण्याची मागणी : बहुजन मुक्ती पार्टीचे अॅड. योगेश शिदगणे

shivrajya patra
सोलापूर : सर्वसामान्य जनतेचा आधारवड असा लौकिक असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बऱ्याच कालावधीपासून बंद आहे. त्यामुळे सामान्य वर्गातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील सामान्य रुग्णांना प्रचंड मनस्ताप तसेच हेळसांड होत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमधील सिटीस्कॅन मशीन पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टी (युवा) जिल्हाध्यक्ष एडवोकेट योगेश शिदगणे यांनी हॉस्पिटल प्रशासनाला शनिवारी एक निवेदन देऊन केलीय.

सिव्हिल हॉस्पिटलमधील सिटीस्कॅन मशीन गेल्या काही दिवसापासून बंद आहे. त्यामुळे उपचार घेण्यास येणाऱ्या व घेत असलेल्या रुग्णांची आवश्यक सेवा उपलब्ध नसल्याने गैरसोय होत आहे. सिव्हिल रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. अशा स्थितीमध्ये सिटीस्कॅन सारखी महत्त्वाची व अत्यावश्यक मशीन बंद असणे म्हणजे गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे, असे बहुजन मुक्ती पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष एडवोकेट शिदगणे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

त्यामुळे रुग्णांच्या जगण्याच्या मूलभूत अधिकाराला बाधा निर्माण झालेली आहे. त्यामुळे गरीब रुग्णांचे आर्थिक शोषण व न भरून येण्याजोगे नुकसान होत आहे, रुग्णांना सिटीस्कॅन करण्यासाठी खाजगी डॉक्टरांकडे रेफर केले जात आहे. सिव्हिल रुग्णालयाचे खाजगीकरणाचे षडयंत्र केले जात आहे, का असे प्रश्न जनतेमधून उपस्थित केले जात आहेत.

या सर्व बाबींची गंभीरता लक्षात घेऊन लवकरात लवकर सिटीस्कॅन मशीन सुरू करावी, अन्यथा बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल व या आंदोलनामुळे सोलापूरमध्ये काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, आंदोलनदरम्यान कुठल्याही प्रकारचे काही नुकसान झाल्यास तसेच आंदोलनतील शामिल नागरिक, सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते,पदाधिकारी यांना व सर्व सामान्य नागरिकांना दुखापत झाल्यास रहदारीला अडथळा निर्माण झाल्यास किंवा यामुळे एखादा अपघात घडल्यास किंवा कोणाचा जीव गेल्यास हा आंदोलन काढण्यासाठी भाग पाडणारे व कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर परिस्थिती निर्माण करणारे संबंधित सर्व अधिकारी स्वतः जबाबदार राहतील, असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे. 

To Top