धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ' शाक्य ' संघाची मानवंदना

shivrajya patra
नागपूर : 
येथील ऐतिहासीक दिक्षाभूमीवर प्रथमच धम्मचक्र प्रवर्तक दिनानिमित्त "शाक्य संघ " दिक्षाभुमी नागपूर "शाक्य संघ सोलापूर व "शाक्य संघ नांदेड सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष गणेवशात सलामी देऊन मानवंदना दिली, हे विशेष नोंद घेण्यासारखे आहे, असे गौरवोद्गार "शाक्य संघ, नागपूरचे अध्यक्ष राजरत्न बनसोड (सेवानिवृत्त सहा. पोलीस आयुक्त, नागपूर) यांनी काढले.

मंगळवारी,२४ ऑक्टोबर रोजी नागपूरच्या दिक्षाभूमीवर ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तक दिनानिमित्त देशाच्या काना-कोपऱ्यासह नेपाळ, थायलँड, जपान, श्रीलंका येथील बौद्ध अनुयायी लाखोच्या संख्येने दिक्षाभुमीवर हातात पंचशीलचे झेंडे व निळे झेंडे घेऊन लाखोंच्या संख्येत उपस्थित होते. निळ्या पाखराच्या थव्यामधून जय बुध्द ! जय भिम!! च्या घोषणेने दिक्षाभूमी मोठ्या आवाजात निनादून गेली होती.

"शाक्य संघ" नागपूर, शाक्य संघ सोलापूर, "शाक्य संघ" नांदेव, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचारी यांनी विशेष गणवेशात धम्मचक्र प्रवर्तक दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास दिक्षाभूमीवर बिगुल वाजवून सलामी देऊन जय बुध्द !जय भिम!! चा नारा देऊन मानवंदना दिली.

याप्रसंगी नागपूरचे "शाक्य संघ'चे अध्यक्ष राजरत्न बनसोड (सेवानिवृत्त सहा. पोलीस आयुक्त, नागपूर), उपाध्यक्ष वसंत काटकर, सचिव रत्नाकर मेश्राम, सहसचिव रोहन सिरसाट, हेमंत नंदेश्वर, भुपेंद्र चहाण "शाक्य संघ महिला बिग्रेड नागपूर, साधना सिरसाट, छाया सिरसाट, अनिता सिरसाट, सुनंदा वानखडे, वैशाली गेडाम, मीरा वानखेडे, संगीता इंगळे, छाया दाभाडे, कुसुम शंभरकर, कोकिळा वाकोडे, इंद्रावती थोरात, मंदा वैरागडे, पवित्रा आठवले, सोनू राऊत वगैरे "शाक्य संघ महिला बिग्रेडचे आदी उपस्थित होते.

"शाक्य संघ" सोलापूरचे शशिकांत बाबरे (सचिव), अशोक दिलपाक, नाना गाडे, "शाक्य संघ महिला बिग्रेड सोलापूरच्या निलावती गाडे, सुनिता दिलपाक, "शाक्य संघ" नांदेडचे अध्यक्ष विजयकुमार उजेडकर, अशोक जोंधळे (सचिव), उत्तम हणुमंते, उत्तम कांबळे, पंढरी अहंकारी, गौतम भंडारे वगैरे "शाक्य" संघ नांदेडचे बौध्द उपासक हजर होते.

"शाक्य संघ दिक्षाभुमी नागपूर, 'शाक्य संघ 'सोलापूर, 'शाक्य संघ सुभेदार रामजी आंबेडकर नांदेडचे सामाजिक बहुउद्देशिय संस्थेचे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी नागपूर येथील दिक्षाभुमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बिगुल वाजवून सलामी देण्याकरिता बहुसंख्येने उपस्थित होते.
To Top