एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची या वर्षात बारावी कारवाई; तेजस कांबळे स्थानबध्द

shivrajya patra
सोलापूर : शहरातील विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील तेजस धर्मपाल ऊर्फ धर्मप्पा कांबळे (वय - २० वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, गोकुळ नगर, जुळे सोलापूर, सोलापूर) याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त  डॉ. राजेंद्र माने यांनी गुरुवारी १९ ऑक्टोबर रोजी त्याच्याविरुध्द एमपीडीए अधिनियम, १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, त्यास त्याच दिवशी रोजी स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, त्यास येरवडा कारागृहात दाखल करण्यात आले.

तेजस कांबळे हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करुन जबरी चोरी, मोटार सायकल चोरी, घरफोडी, गैरकायद्याची मंडळी जमविणे, दुखापत करणे, खंडणी मागणे, तडीपार आदेशाचा भंग करणे, घराविषयी आगळीक आणि धमकी देणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने, अवैध आर्थिक लाभ मिळवण्यासाठी करीत आला. 

त्याच्याविरुध्द गंभीर स्वरुपाचे एकुण १५ गुन्हे सोलापू शहरात दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. तेजस कांबळे याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरीकांमध्ये दहशत असल्याने त्याच्याविरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत, असेही पोलिसांचे मत आहे.

तेजस कांबळे यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०२१ मध्ये क.५६(१) (अ) (ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतरही तेजस कांबळे याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल, अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालु ठेवली. त्यामुळे त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली.

ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे / विशा) डॉ. दीपाली काळेपोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग - ०२)
राजु मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दोरगे, विजापुर नाका पोलीस ठाण्याचे वपोनि राजकुमार वाघचवरे,पोउपनि विशेंद्रसिंग बायस व एमपीडीए पथकातील अंमलदार पोहेकॉ /८३३ विनायक संगमवार, पोहेकॉ / १२५४ सुदीप शिंदे, पोशि/ १९१६ अक्षय जाधव, पोशि/ ६५४ विशाल नवले यांनी पार पाडली.

पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने सोलापूर शहर यांनी कार्यभार स्विकारल्यापासून एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची ही सोळावी तर या वर्षातील बारावी कारवाई आहे.
To Top