अक्कलकोट/३१ : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला सर्वस्वी पाठिंबा देत असून सकल मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत आरक्षण देण्यात यावे, त्याचप्रमाणे या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाने राज्यभर रौद्र रूप धारण करत असून, त्याचा एक भाग म्हणून सांगवी (बु) येथे आज रास्ता रोको आंदोलन करून मंडळ अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
'आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाच', 'एक मराठा, लाख मराठा' च्या घोषणांनी परिसर दणाणला. अक्कलकोट तालुक्यातील सांगवी (बु.) येथे मंगळवारी, सायंकाळी आरक्षणासाठी सकल मराठा समाजाकडून मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
यावेळी प्रविण घाटगे, राम माने, संदीप सलबत्ते, यतिराज भोसले, विशाल घाटगे, मदन राठोड, पिंटू चव्हाण, पवन चव्हाण, रावसाहेब मोरे, लक्ष्मण यादव, समर्थ पल्लुर, गोविंद पुलुर, दिग्विजय घाटगे, गणेश रेड्डी, सागर मोरे, आनंद निकम, निवृर्ती रेड्डी, रोहन पालकर, ओंकार बाबर, ओमकार घाटगे, पुष्कराज घाटगे, शिवांश सलबत्ते, निलेश निकम, विष्णू पाटील, राजकुमार रेड्डी, विनोद कोळी, रोहित घाटगे, विशाल कोरे, पिंटू वाघमारे, अभय पूल्लूर, पवन भोसले, कृष्णात ढेंगळे, शिवाजी टोणपे, शिवाजी भोसले, सागर मोरे, संग्राम घाटगे यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.