मंगळवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

shivrajya patra
सोलापूर : जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांसाठी मंगळवारी, ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांचेमार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले असल्याचे प्रभारी सहायक आयुक्त ह. श्री. नलावडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. रोजगार मेळाव्यात १० वी, १२ वी, आय.टी.आय. वेल्डर, फिटर, डिप्लोमा, ग्रॅज्युएट,  ऑफिस असिस्टंट, नर्सिंग, पदवी, इलेक्ट्रीशीय, मशिन ऑपरेटर अशा प्रकारची एकुण ४१० पेक्षा जास्त रिक्तपदे २ उद्योजकांनी ऑनलाईन अधिसुचीत केलेली आहेत.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर येथे प्रत्यक्ष भेटीद्वारे अथवा ०२१७-२९५०९५६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे  प्र. सहायक आयुक्त नलावडे यांनी केले आहे.
To Top