लक्षवेधी पोलीस गोळीबारात फुटलं कारचं टायर टोळीकडून ६ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त

shivrajya patra
सोलापूर : पोलीस अधिकाऱ्यानं स्वतःच्या बचावासाठी  झाडलेल्या गोळीनं कारचं टायर फुटलं. त्या थरारनाट्यातील साखळीबध्द तपासात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला शस्त्रांचा धाक दाखवून लूट करणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड करण्यात यशस्वी झाले. ही आंतरजिल्हा टोळी असून, त्यांच्या ताब्यातून ६ लाख १४  हजार रुपयांचा हस्तगत करण्यात पोलिसांना हस्तगत केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांनी दिली.

११ ऑक्टोबर रोजी पहाटे निलम नगरातील बालाजी ज्वेलर्समध्ये धाडसी चोरीची घटना घडली होती. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी राहुल रविंद्रसिंग भोंड, (रा. हडपसर) व सुरज प्रकाश चव्हाण (रा. सुनिल नगर, एमआयडीसी, सोलापूर) या आरोपींना यापूर्वीच गजाआड केले होते. ते पोलीस कोठडीत असून एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीसांनी आरोपी सुरज चव्हाण याचेकडे घरफोडीच्या उर्वरित मालासंबंधी कसून चौकशी केली असता, त्याने चोरीतील उर्वरित दागिने प्रेम काशीनाथ कोळी याच्याकडे असल्याचे सांगितले. 

त्यानुसार पथकाने कोळी याला एमआयडीसीतील
कलावती नगरातून अटक करून बालाजी ज्वेलर्समधून चोरलेल्या दागिन्यापैकी २ किलो चांदी व १ ग्रॅम सोने जप्त केले. यातील आरोपी प्रेम कोळी याच्याकडे कसून चौकशी करता, १४ ऑक्टो २३ रोजी पहाटे दरोडा घालण्याच्या उद्देशाने विणकर वसाहत येथून चोरलेली व कोंड्याल शाळेजवळ लावून ठेवलेली अल्टो चार चाकी वाहन घेण्यासाठी प्रेम कोळी व त्याचे इतर दोन साथीदार तिलकसिंग गब्बरसिंग टाक व हन्सराज ऊर्फ हन्सुसिंग रणजितसिंग टाक असे मिळून अल्टो लावून ठेवलेल्या ठिकाणी गेले होते. या आरोपींनी पोसई रजपूत यांच्या अंगावर वाहन घेऊन जात असताना वाहन थांबविण्यासाठी पोसई विक्रम रजपूत यांनी त्यांच्या वाहनाच्या टायरच्या दिशेने फायरिंग केल्यावर सदर आरोपी पळून गेले होते. हा गोळीबार तपास कार्यात लक्षवेधी राहिला होता. पोउनि रजपूत यांनी प्रेम काशिनाथ कोळी यास अटक करून चोरीसाठी वापरण्यात आलेली वाहने व मुद्देमाल जप्त केला.

ही टोळी गुन्हे करत असताना पिस्टल, चॉपर इत्यादी सारखी शस्त्रे बाळगत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुणे, नगर पोलीसही त्याच्या मागावर होते, या पथकाने एकूण ६ गुन्हे उघड करून ६ लाख १४ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला, असल्याचे वपोनि माने यांनी सांगितले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने, पोलीस उप-निरीक्षक विक्रम रजपूत, राकेश पाटील, नाना उबाळे, दिपक डोके, सचिन भांगे, पोना, मंगेश गायकवाड, शैलेश स्वामी, सुहास अर्जुन, शंकर बाळगी, काशीनाथ वाघे, दिपक नारायणकर, अमोल यादव, आमसिध्द निवाल, देवीदास कदम, भारतसिंग तुक्कुवाले यांनी पार पाडली.
To Top