अनैतिक काम असो वा संबंध ते कधीतरी चव्हाट्यावर येतातच ! मानलेल्या नणंदेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

shivrajya patra

सोलापूर : अनैतिक काम असो वा संबंध ते कधीतरी चव्हाट्यावर येतातच ! पतीचे मानस नणंदेशी असलेले नाजूक संबंध चव्हाट्यावर आणल्याचा रोष मनात धरून सासरच्या मंडळींनी केलेल्या जाचहाटास कंटाळलेल्या विवाहितेने पोलिसांकडं धाव घेतलीय. योगीता कार्तिक रेड्डी (वय-३० वर्ष) असं तिचं नांव आहे. तिच्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलिसांनी तिचा पती कार्तिक रेड्डी यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीतांमध्ये मानलेल्या नणंदेचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोलापुरातील नई जिंदगी परिसरातील भाग्योदय हाउसिंग सोसायटीतील रहिवासी सौ. योगीता हिने सासरी नांदत असताना, प्रारंभी सर्व सुरळीत चालले होते, मात्र पतीचे बाहेरख्याली वर्तन तिच्या निदर्शनास आल्यावर, तिने हा प्रकार चव्हाट्यावर आणून पतीस जाब विचारला. त्यामुळे त्या कुटुंबात सौ. योगीताचा शारिरीक व मानसिक छळ करण्यासाठी पदोपदी संधी निर्माण करू लागले.

जवळपास एप्रिल २o१७ ते जून २०२२ या काळात सौ. योगीता ही सासरी नांदत असताना, तिच्या पतीचे दिपा नावाच्या तरुणीच्या जवळीक साधून होता. ती तरुणी रेड्डी कुटुंबात वा चार-चौघात वावरताना, सौ. योगीताची मानलेली नणंद म्हणून ओळखली जात होती. तिची कार्तिकशी असलेल्या जवळीतेत उभयतांचे नाजूक संबंध सर्वासमोर उघड केले. त्याचा राग मनात धरून सौ. योगीताची चूक नसताना विनाकारण घालून पाडून बोलणे, उपाशी ठेवणे, शिळे अन्न खावयास देणे घरातील कामे एकटीलाच करायला लावणे, मोलकरीनसारखी वागणूक देणे, माहेरच्या लोकांला शिवीगाळ करून दमदाटी करणे, लग्नात हुंडा व सोने दिले नाही, आमचे मुलांचे श्रीमंत घराण्यातील मुलीशी लग्न केले असते तर भरपूर हुंडा व सोने मिळाले असते, असं म्हणून छळ करीत होते.

शेवटी तू आम्हाला व्यवसायासाठी ५ लाख रूपये घेवून ये, असे म्हणून सौ. योगीताला (सध्या रा. मुपो निबर्गी ता. दक्षिण सोलापूर) मारहाण करून शिवीगाळ करून मानसिक व शारीरीक त्रास दिला, तसेच दिपाच्या सांगण्यावरून कार्तिक हा  सौ. योगीताला मारहाण शिवीगाळ करून मानसिक व शारीरीक त्रास देऊन तिचे  वैवाहिक जीवन उध्दवस्त केले आहे. तिच्या फिर्यादीनुसार पती कार्तिक रेड्डी, सासू सुनंदा रेड्डी, ३) नणंद सुधा कुमार, आणि दिपा (मानलेली नणंद) (सर्व रा. अमर हॉटेल जवळ भाग्योदय हौसिंग सोसायटी, नई जिंदगी, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोना/११९५/बहिर्जे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
To Top