ज्येष्ठ कीर्तनकार पू. बाबा महाराज सातारकर यांचं निधन

shivrajya patra
मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार पू. बाबा महाराज सातारकर (वय ८९) ह्यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले.आपल्या सुमधुर आवाजाने त्यांनी महाराष्ट्र आणि देशभरात वारकरी कीर्तनाची परंपरा जतन केली होती. त्यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केलीय.

सोलापूरचे वंदनीय व्यक्तिमत्व वै. भाऊ थावरे आणि बाबा महाराज सातारकर ह्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. अनेक मोठ्या कार्यक्रमात बाबा महाराज भाऊंना आपल्या शेजारी बसवून घेत असत. बाबा महाराजांचे चरित्र भाऊंनी प्रसिद्ध केले होते.

त्यांचा हरिपाठ आणि "कैवल्याचा पुतळा" ही दूरदर्शन वरील प्रवचने प्रचंड गाजली होती.

त्यांच्या जाण्याने सर्व शिष्य परिवारात शोककळा पसरली आहे. या शब्दात संजीव कुसुरकर (पुणे) यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित केलीय.




To Top