पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या उत्सव मूर्तीची पालखी मिरवणूक

shivrajya patra
सोलापूर : पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने उत्सव मूर्तीची पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. तत्पूर्वी माजी महापौर महेश कोठे यांच्या हस्ते गणरायाचा विधिवत पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. 

मद्दा मंगल कार्यालय येथून पूर्व विभाग सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या उत्सव मूर्तीची पालखी मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. माजी महापौर महेश कोठे यांच्या हस्ते गणरायाचा विधिवत पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. 

याप्रसंगी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, जगदीश पाटील, विष्णू कारमपुरी, प्रभाग मध्यवर्तीचे उत्सव अध्यक्ष विजय साळुंखे, पूर्व विभाग मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी पांडुरंग दिड्डी, अक्षय अंजिखाने, आशुतोष दंडी, सल्लागार नागेश गंजी, सिनेट सदस्य यतीराज होनमाने, अरविंद चिन्नी, शिलवंत छपेकर, किरण वल्लाल, सुरेश यल्लाराम, रोहन श्रीराम, रमेश पांढरे, प्रशांत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

दरम्यान 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' चा जयघोष करण्यात आला, हलग्यांच्या कडकडाटात पालखी मिरवणूक मार्गस्थ झाली.
To Top