कासेगांव/प्रतिनिधी : उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा येथील हर्षवर्धन हायस्कूल शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षवर्धन लोंढे, संस्थेचे उपाध्यक्ष विद्याधर जगताप, संस्थेचे सचिव विठ्ठलराव गरड, संस्था सदस्य श्रीमती पुष्पा लोंढे, विपुलराव गंभीरे, मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांचा इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाविषयी माहिती आपल्या मनोगतातून सांगितली. त्याचप्रमाणे प्रशालेतील शिक्षक संजय जवंजाळ यांनी शिक्षक दिन का साजरा करण्यात येतो, याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्याचप्रमाणे श्रीमती पुष्पा लोंढे यांनी शिक्षकांचे गुण आत्मसात करून विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी कु.आरोही प्रदीप पाठमास हिने सहाशे मीटर धावणे स्पर्धत स्तरावर निवड झाली, याबद्दल तिचा सत्कार उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला. इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार केले.