सोलापूर : येथील शासकीय मैदान, नेहरूनगर येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय १४ वर्षाखालील मुले व मुली ८० मीटर हर्डल रनिंग या स्पर्धेमध्ये राजेश कोठे इंग्लिश स्कूल, हगलूरच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. १४ वर्षाखालील ८० मीटर हर्डल मुली या स्पर्धेत धनश्री बाळासाहेब शिंदे हिने द्वितीय क्रमांक पटकावला तर १४ वर्षाखालील ८०मीटर हर्डल मुले या स्पर्धेमध्ये लक्ष्मण वसंत सुरवसे याने तृतीय क्रमांक पटकावला.
विद्यार्थीनी धनश्री शिंदे हिची जिल्हास्तरीय ८० मीटर हर्डल या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक दीपक कळसे यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी खेळाडूंचे संस्था अध्यक्ष महेश कोठे, डॉ. राधिका चिलका, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, देवेंद्र कोठे, प्रथमेश कोठे, व मुख्याध्यापिका लीलावती रनसुभे आदींनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.