नागरिकांनी अनोळखी व्यक्ती, भाडेकरूंची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्याला द्यावी : अपर जिल्हा दंडाधिकारी

shivrajya patra

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कलम १४४ चे आदेश 
७ सप्टेंबर ते ५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत लागू

सोलापूर/१४ : फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १९७३ चे कलम१४४ अन्वये सोलापूर (ग्रामीण) जिल्ह्यातील सर्व घरमालक, प्रॉपर्टी डिलर, ब्रोकर, एजंट, मस्जिद, चर्च, धर्मशाळा, जुने वाहन विक्री खरेदी करणारे व्यक्ती व संस्था, भाड्याने वाहन देणारे व्यक्ती व संस्था तसेच धार्मिक स्थळांचे विश्वस्त व काळजीवाहक यांना खालील कृत्यांना बंदी घालत आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी दिले आहेत.


१. कोणत्याही अनोळखी नवीन रहावयास येणाऱ्या व्यक्तींची व त्यांच्या वास्तव्यासंबंधीची संपूर्ण माहिती तसेच सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात जी जी व्यक्ती नव्याने राहण्यासाठी येईल, अथवा रहावयास आल्यावर अथवा रहावयास येण्याबाबत विचारपूस केल्यानंतर लगेच न चुकता संबंधित पोलीस ठाणेला त्यांचे संबंधीची माहिती न देणे व अशा अनोळखी व्यक्तींना रहावयास जागा पोलीसांना माहिती न देता उपलब्ध करुन देणे. 


२. कोणत्याही अनोळखी नवीन जुने वाहन घेण्यास येणाऱ्या व्यक्तीची व त्यांच्या वास्तव्यासंबंधीची संपुर्ण माहिती तसेच जुने वाहन घेण्यासाठी विचारपूस केल्यानंतर लगेच न चुकता संबंधित पोलीस ठाणेस त्यांचे संबंधीची माहिती न देणे व अशा अनोळखी व्यक्तींची पोलीसांना माहिती न देत जुने वाहन खरेदी विक्री भाड्याने उपलब्ध करून देणे.


पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या दिनांक १ सप्टेंबर २०२३ रोजी च्या पत्रानुसार सदर चा आदेश हा दि. ७ सप्टेंबर २०२३ रोजी ते दि. ५ नोव्हेंबर २०२३ ( दोन्ही दिवस धरून) सोलापूर जिल्हयाचे ग्रामीण हद्दीत लागू राहील, असे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शमा पवार यांनी निर्देशित केले आहे.
To Top