मध्य रेल विशेष तिकीट तपासणी अभियानात ९ लाख ३८ हजाराहून अधिक दंडात्मक कारवाई

shivrajya patra
सोलापूर : मध्य रेल सोलापूर विभागात शनिवारी, 23 सप्टेंबर रोजी सकाळी सहा ते दुपारी दोन वाजता दरम्यान तिकीट चेकिंग स्टाफ यांनी “मध्य रेल" च्या सोलापूर विभागात या तिकीट तपासणी विशेष मेगाड्राइव्ह करण्यात आली. या
ड्राइव्हमध्ये सहभागी एकूण तिकीट तपासणी कर्मचारी १०० होते आणि ०२ आर.पी.एफ. कर्मचारी सहभागी होते. त्यांनी एकूण १४३७ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून ८,५८, ७७० रूपये वसूल करण्यात आले.

शनिवारी सकाळपासून ह्या कारवाईस प्रारंभ झाला. तिकिट चेकिंग स्टाफ यांनी तिकीट तपासणी विशेष मेगाड्राइव्ह सोलापूर . विभागात  वाणिज्य  विभागाद्वारे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरजकुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक एल. के. रनयेवले यांच्या विशेष तिकीट तपासणी मेगाड्राइव्ह करण्यात आली.

विशेष टिकट जॉंच अभियानांतर्गत स्पॉट चेकिंगच्या माध्यमातून विशेष टिकट जॉंच अभियानात मेल एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांना चेक केले. ह्यामध्ये विना तिकीट प्रवासी, अनियमित प्रवासी व प्रमाणापेक्षा जास्त सामान घेऊन जाणारे प्रवासी, घाण पसरविणारे प्रवासी  इत्यादी एकुण ६९५ प्रवाशांना पकडून दंडात्म‍क स्वरूपात रू. ४, ०५, ३३५  तथा नियमित तिकीट जांच मिळून एकूण १४३७  प्रवाशांना पकडून दंडात्म‍क स्वरूपात ८,५८, ७७० रुपये वसूल करण्यात आले.

या दरम्यान १२ अनाधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करून ४५२० रूपये, रेल्वे लायसन्सी स्टॉल-५५, ५०० रूपये, पे अँड युज १३.००० रुपये, पार्किंग ९, ५०० रुपये, आणि पार्सल २००० असे एकूण ८०, ००० रूपये दंड वसूल करण्यात आल्याचे विभागीय वाणिज्य कार्यालय जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.

To Top