Type Here to Get Search Results !

आदर्श मार्कंडेय प्रशालेत शिक्षक दिन उत्साहात साजरा


सोलापूर : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंती दिवस मजरेवाडी येथील आदर्श मार्कंडेय प्रशाला व उद्धव राज प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड होते. 
कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सोलापूर शहर दक्षिणचे माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील बिराजदार, संतोष धोत्रे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशालेतील निवृत्त शिक्षक व शिक्षिका मंदाकिनी रणदिवे, बाबू राठोड, विजयसिंह देशमुख, प्रशालेतील, प्राथमिक शाळेतील शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, पालकांचा सत्कार करण्यात आला. यानंतर प्रशालेतील ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त आपले उत्कृष्ट मनोगत व्यक्त केले. 

यानंतर पालक सभेचे अध्यक्ष संतोष धोत्रे, माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील बिराजदार, प्रशालेचे सहशिक्षक काशिनाथ जंगलगी, प्रा. शिवलिंग अचलेरे, निवृत्त सहशिक्षक बाबु राठोड यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचा आढावा घेतला.  शिक्षक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात, सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून आणि शिक्षक दिनाचे महत्त्व विशद करून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. 
याप्रसंगी उद्धव राज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वाघेश शास्त्री, प्रशालेचे ज्येष्ठ सहशिक्षक अनिल मागाडे, शांतप्पा स्वामी, श्रीशैल स्वामी,  प्रा. अभिजीत भंडारे, संध्या भिंगारे, मंगल बनसोडे, शिक्षकेत्तर कर्मचारी दत्ता गायकवाड, पालक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन सिद्धारूढ साळुंखे यांनी केले तर संध्या मगर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.