सोलापूर : मराठा आरक्षणासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे साखळी उपोषणाची सुरुवात होत आहे. या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दिला. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री सदाशिव पवार यांनी मराठा सेवा संघाची भूमिका मांडली.
याप्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री सदाशिव पवार, जिल्हा सचिव शिवश्री प्रा. लक्ष्मण महाडिक, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शिवश्री प्रकाश ननवरे, उपाध्यक्ष सचिन चव्हाण, राजेंद्र भोसले, प्रकाश व्यवहारे, प्रकाश डोंगरे, किरण जाधव, कुमार शिरसागर, रमेश जाधव, रविकांत पवार, पृथ्वीराज चव्हाण हे मराठा बांधव उपस्थित होते.