४.५ टीएमसी पाणी भीमा नदीमध्ये सोडण्याचा निर्णय दोन महिण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार

shivrajya patra

सोलापूर :  हल्ली सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे टंचाई सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उजनी धरणामध्येही पाण्याची पुरेशी आवक न झाल्यामुळे परिस्थिती आणखी कठीण झालेली आहे. अशा परिस्थितीत भीमा नदीवरील सोलापूर, पंढरपूर, सांगोला शहरासह इतर ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना पिण्यासाठी पाण्याची टंचाई निर्माण होण्याची परिस्थिती आली होती.


या सर्व परिस्थितीचा विचार करून 
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भीमा नदीवरील सोलापूर, पंढरपूर, सांगोला शहरासह इतर ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजनासाठी मंगळवारी, १९ सप्टेंबरपासून उजनी धरणातून ४.५ टीएमसी पाणी भीमा नदीमध्ये सोडण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे. 

या निर्णयामुळे भीमा नदीवरील सोलापूर, पंढरपूर. सांगोला शहरासह इतर ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दोन महीने कालावधीसाठी मिटणार आहे.

To Top