जीव धोक्यात घालून वीज वितरण कर्मचाऱ्यांची सेवा

shivrajya patra

         
सोलापूर : येथील लाल आखाडा तालीम संघाचा गदाधारी हनुमान अवतारातील गणेशाची मूर्ती भोई गल्ली येथून विजेच्या तारांमुळे पुढे सरकत नव्हती. परंतु तुळजापूर वेस शाखा क्रमांक एकचे शाखाधिकारी संजय भोसले यांच्या टीममधील वीजवितरणच्या संतोष शिंदे, धनंजय गणेशकर आणि बिरुदेव लवटे या कर्मचाऱ्यांनी आडव्या येणाऱ्या तारा आणि विजेच्या केबल प्रयत्नांची पराकाष्टा करून लाकडी डिस्चार्ज आकड्याने बाजूला सारून मिरवणुकीला वाट मोकळी करून दिली. 

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांचे तोंडभरून कौतुक केले. त्यासाठी या मार्गावरील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. 
To Top