सोलापूर : सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भारत मुक्ती मोर्चा आयोजित सत्यशोधक संमेलन रविवारी, २४ सप्टेंबर रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची अध्यक्षता भारत मुक्ती मोर्चाचे (नवी दिल्ली) राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे करणार असल्याचे भारत मुक्ती मोर्चाचे सिद्धार्थ बोराडे यांनी सांगितले.
रविवारी सायंकाळी ५ वा. या संमेलनाचे उद्घाटन होत असून ते रात्री १० वाजेपर्यंत चालणार आहे. हे संमेलन ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे मैदान, आरटीओ ऑफिस जवळ, पुणे, येथे होत आहे. या संमेलनात क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी स्थापित केलेल्या सत्यशोधक समाज स्थापनेपासून त्या समाजाच्या वाटचालीवर मंथन होणार आहे.
मुख्य अतिथी म्हणून प्रसिद्ध इतिहासकार मा. म.देशमुख (नागपूर), बाबा आढाव (संस्थापक अध्यक्ष, हमालपंचायत), प्रवीण गायकवाड (प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड) तर विशेष अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, व्ही. व्ही. जाधव (राष्ट्रीय उपाध्यक्ष, बामसेफ नवी दिल्ली) आणि अॅडवोकेट वासंती नलावडे (राज्य पदाधिकारी, आयएलपीए) हे उपस्थित राहणार आहेत.
फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील अनुयायांनी या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असं आवाहन भारत मुक्ती मोर्चा, सोलापूर जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बोराडे यांनी लेले आहे.