सोलापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर आणि ए. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार महिला उमेदवारांसाठी मंगळवारी, २६ सप्टेंबर २०२३ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नोकरीइच्छुक महिला उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या रोजगार मेळाव्यात १० वी, १२ वी, आय. टी. आय डिप्लोमा, ग्रॅज्युएट, कोणतीही पदवी, इलेक्ट्रीशीयन, नर्सिंग, बी.कॉम, अशा प्रकारची एकुण ७०० पेक्षा जास्त रिक्त पदे सोलापूर आणि पुणे येथील उद्योजकांनी अधिसुचीत केलेली आहेत.
नोकरी इच्छुक महिला उमेदवारांनी आपल्या कागदपत्रासह मंगळवार, दिनांक २६ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० वा. “ए. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, रविवार पेठ, राजेंद्र चौक, सोलापूर" येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या ०२१७-२९५०९५६ या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्र.सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, सोलापूर यांनी केले आहे.