सोलापूर : पोलीस अधिकारी-कर्मचारी, महिला कर्मचारी तसेच मराठा महिला आंदोलकांवर जालना जिल्ह्यात झालेल्या दगडफेकीचा आर्यन्स करिअर अकॅडमी, सोलापूरतर्फे निषेध नोंदविण्यात आला. त्या घटनेची सखोल चौकशी करून दगडफेक करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन आर्यन्स करिअर अकॅडमीतर्फे पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांना देण्यात आले.
जालना जिल्ह्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. आजपर्यंत झालेल्या ५८ मोर्चांमध्ये कधीही गालबोट लागले नव्हते. पोलीसांनी लाठीचार्ज केल्यानंतर बाहेरून काही लोकांनी दगडफेकीला सुरुवात केली. त्यात अनेक पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी तसेच मराठा समाजातील माता-भगिनी देखील जखमी झाल्या. समाजाचे रक्षक असणारे पोलीस कर्मचारी आणि माता भगिनींवर दगडफेक करणे अत्यंत निंदनीय आहे.
निवेदन देताना अमितकुमार अजनाळकर, वैभव बनसोडे, अक्षय गायकवाड, दिनेश काकी, आकाश आहेरकर, दिनेश वाघमारे आणि सागर कट्टीमनी उपस्थित होते.