Type Here to Get Search Results !

जैन गुरुकुलची विद्यार्थीनी ज्योती खंडागळे हिचे दैनिक लोकमत आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत यश



सोलापूर : येथील जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. ज्योती कृष्णदेव खंडागळे ही  दैनिक लोकमत सोलापूर आयोजित एक दिवसीय बुद्धिबळ स्पर्धेत विजयी झाली आहे. मार्गदर्शक शिक्षकवृंद सुभाष उपासे, प्रसन्न काटकर, विभाग प्रमुख संजय पंडित यांचे तिला मार्गदर्शन लाभले. समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांची ती नात आहे.
या प्रशालेतील इतर सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे मानद सचिव मा. डॉ. रणजित गांधी,  पराग शहा, प्राचार्य आशुतोष शहा, उपप्राचार्य शैलेश पांगळ, पर्यवेक्षक राजकुमार काळे यांनी अभिनंदन केले आहे. कु. ज्योती खंडागळे हिच्या यशाबद्दल अभिनंदन केले जात आहे.