सोलापूर : अकोलेकाटीत मुस्लिम कब्रस्थान गेल्या महिण्यात पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण करण्यात आलं आहे. अल्पसंख्य समुदायातील ग्रामस्थांनी ते अतिक्रमण हटविण्यासंबंधी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला, मात्र सरपंच आणि ग्रामपंचायत कार्यकारिणीनं त्या अतिक्रणाकडं जणू डोळेझाक केलीय. त्या ग्रामस्थांनी ही तक्रार गुरुवारी, ०७ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे केलीय.
अकोलेकाटी येथील मुस्लिम कब्रस्थानच्या जागेसमोर गावातील एका व्यक्तीने अतिक्रमण करून त्या जागेवर पत्र्याचे शेड तयार केले आहे, त्यामुळे गावातील सर्व मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे विनाकारण दोन समाजात तेढ निर्माण होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे, याची माहिती लेखी अर्ज स्वरूपात अकोलेकाटी ग्रामपंचायत व महिला सरपंच यांच्याकडे करण्यात आली.
परंतु अकोलेकाटी येथील महिला सरपंच पती व ग्रामसेवक संगनमताने ते अतिक्रमण केलेल्या व्यक्तीस वेळोवेळी सांगूनही हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून, त्यास पाठीशी घालत आहेत. ती व्यक्ती सरपंच पती यांच्या समाजाचा आहे. हा विषय २५ ऑगस्ट च्या ग्रामसभेत सरपंच पतीने मांडून दोन समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न केला.
त्या ग्रामसभेस पोलीस बंदोबस्त असूनही संबंधित व्यक्ती व सरपंच पती यांच्याकडून, त्या शेडला विरोध करणाऱ्यांना दमदाटी व शिवीगाळ झाली. त्यास अल्पसंख्यांक समाजाने कोणत्याही प्रकारचा विरोध नाही. त्यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि उत्तर सोलापूर तालुक्याच्या गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे केले होते.
पोलिसांनी संबंधित व्यक्तीस समज ही दिली, परंतु तो व्यक्ती गावात सावकारी व दादागिरी करत असल्या कारणाने पोलिसांनी समज देऊनही त्यांनी ते शेड काढलेला नाही, गावातील सर्व नागरिकांसमोर तो ग्रामसभेत ही सांगतोय की, मी कोणीही आले तरी तो शेड काढणार नाही, त्यामुळे मुस्लिम समज शेवटी सनदशीर आपल्याकडे येऊन न्याय मागत आहे, त्या शेडवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून ग्रामपंचायतीची मंडळ बरखास्त करुन त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती हमीद बादशहा मुलाणी, जिलाणी अल्लाउद्दीन मुलाणी, शाहिद महिबुब मुलाणी आणि
प्रहार संघटनेचे उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष फिरोज पठाण यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केलीय.