मंगळवारी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या "उत्तम अभियंता" पुरस्कार वितरण समारंभ

shivrajya patra
सोलापूर : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म दिवस अर्थात १५ सप्टेंबर अभियंता दिवस हा देशभर साजरा केला जातो. अभियंता दिनाचे औचित्य साधून शहर जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील अभियंत्यांना "उत्तम अभियंता पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी, २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०५.४५ वा. लोकमान्य टिळक सभागृह (अॅम्पी थिएटर), चार पुतळा चौक जवळ, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आशुतोष नाटकर यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिली.

शासकीय अधिकारी व कर्मचारी कला, कौडा, साहित्य व सांस्कृतिक मंच यांच्या वतीने अभियंता दिनानिमित्त "उत्तम अभियंता पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात येते. पुरस्कार वितरणाचे यंदाचे १३ वे वर्ष आहे, असे आशुतोष नाटकर यांनी प्रारंभी म्हटले.

या पुरस्कार वितरण सोहळ्याला अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे,  जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के, सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालय सोलापूरचे अधीक्षक अभियंता संजय माळी, महावितरण, सोलापूर मंडळ कार्यालयाचे प्रभारी अधिक्षक अभियंता संजीवकुमार शिंदे, राष्ट्रीय महामार्ग, सोलापूर कार्यकारी अभियंता (सेवानिवृत्त) अशोक भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे नाटकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पुरस्कार गौरव पत्र, शाल, बुके, भारतीय संविधान प्रत असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक आशुतोष नाटकर व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

.......... यंदाचे मानकरी 

सन २०२२-२०२३ चे "उत्तम अभियंता पुरस्कार" मानकरी इंजि. केशव घोडके (भारतीय राष्ट्रीय महामार्ग, पंढरपूर), इंजि. डॉ. दिलीप घायतिडक (विभाग प्रमुख, स्थापत्य अभियंता, शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर), सागर पाटील (मोटार वाहन निरीक्षक, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर), विवेक लोंढे (यंत्र अभियंता (चालन), महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, सोलापूर), अवधुत जाधवर, (प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विजापूर रोड, सोलापूर), श्रीकांत सुर्यवंशी (विभागीय अभियंता (स्थापत्य), महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, सोलापूर), निलप्पा उंबरजे, (महा. अभियंता श्रेणी-२, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, दक्षिण सोलापूर), डॉ. राजकुमार देशमुख (सहा. मोटार वाहन निरीक्षक, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर), श्रीकांत कोडला (सहाय्यक अभियंता महावितरण, चाचणी विभाग सोलापूर), रघुराज चव्हाण ( पोलीस उपनिरीक्षक (तांत्रिक अभियंता), पोलीस आयुक्त कार्यालय, शहर सोलापूर), याकुब सय्यद (पोलीस उपनिरीक्षक, बिनतारी संदेश (वाहतूक), राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १०, सोरेगांव, सोलापूर), विष्णु कांबळे ( पोलीस उपनिरीक्षक, संदेशवहन विभाग, पोलीस अधिक्षक कार्यालय, सोलापूर ग्रामीण), नितीन राजगुरू (कनिष्ठ अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, सोलापूर), श्रीमती रूचिरा साखरे (शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. १. अकलुज), सतीश चवरे (कनिष्ठ अभियंता, उजनी कालवा विभाग क्र. ९. मंगळवेढा), आकाश बचुटे (कनिष्ठ अभियंता, महावितरण, शाखा कार्यालय कामती), अविनाश घाडगे (कनिष्ठ अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, सोलापूर), नंदकुमार मार्तंडे, (वरिष्ठ तंत्रज्ञ, महावितरण, शाखा, गुरूनानक नगर, सोलापूर) हे आहेत.
To Top