बॅ.भोसले प्रशालेत हिंदी दिन उत्साहात साजरा

shivrajya patra

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे कासेगांव येथील बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशालेत राष्ट्रभाषा हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक संगन्ना मुचंडे होते. 

ह्यावेळी विद्यार्थ्यांनी हिंदी दिनाविषयी भाषणे, कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हरिभाई देवकरण प्रशालेचे पर्यवेक्षक मोतीबने यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.

यावेळी कार्यक्रमाला शालेय शिक्षण समितीचे सदस्य चंद्रकांत कसबे,  गांव तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष रामहरी चौगुले तसेच लक्ष्मण जाधव, प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम काटकर यांनी केले तर हरुण तांबोळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
To Top